विज्ञापित

‘Bappa.org’च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा

(नंदुरबार) महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवातील विविध परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रथा डिजिटल स्वरूपात जतन करून त्या व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी‘Bappa.org’हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘Bappa.org’च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा
bappa-org-showcases-nandurbar-ganeshotsav-tradition-to-the-world

नंदुरबार जिल्ह्यालाही विविध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचा समृद्ध वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील कुटुंबे, गाव आणि गणेश मंडळांकडून पिढ्यान्‌पिढ्या जपल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दस्तऐवजीकरण करण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.
‘Bappa.org’वर आपल्या बाप्पाची कथा नोंदवा!
नागरिकांना आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, पारंपरिक प्रथा, आरास, छायाचित्रे, आरती, नैवेद्य, पारंपरिक पाककृती तसेच इतर सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती** डिजिटल स्वरूपात शेअर करता येणार आहे.
**एक छायाचित्र… एक आठवण… एक परंपरा!
आज आपल्या घरात किंवा गावात जपली जाणारी एखादी परंपरा उद्याच्या पिढीसाठी मौल्यवान सांस्कृतिक ठेवा ठरू शकते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या बाप्पाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, आठवणी आणि माहिती‘Bappa.org’च्या माध्यमातून नोंदवावी.
आपल्या बाप्पाची कथा जगासमोर आणण्यासाठी आणि नंदुरबारच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे जतन करण्यासाठी जिल्हावासीयांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, नंदुरबार** यांनी केले आहे.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: