सेवा संकल्प अभियानांतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण

नंदुरबार:-सेवा संकल्प अभियानांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (SBI RSETI), नंदुरबार येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची बॅच यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण
Certificate Distribution to Beauty Parlor Trainees Under 'Sewa Sankalp Abhiyan'

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर व जिल्हा व्यवस्थापक उमेश अहिराव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणार्थींनी RSETIच्या माध्यमातून मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था संचालक प्रमोद शिंदे, फॅकल्टी गिरीधर बैसाणे, श्रीमती अश्विनी पाटील, विशाल पाटील, अक्षय तांबोळी, DST, शिवणकाम प्रशिक्षिका श्रीमती समीना शेख, राजेंद्र पवार, संजय नाईक यांच्यासह ब्युटी पार्लर व शिवणकाम प्रशिक्षणाच्या बॅचमधील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ग्रामीण युवक- युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: