दहा हजार लिटर पाण्यात महादेवाची पिंड; धडगावच्या शेतकऱ्यांचे पावसासाठी अनोखे साकडे

धडगाव : पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या धडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वरुणराजाला साकडे घालत अनोख्या पद्धतीने महादेवाची आराधना केली. येथील पुरातन महादेव मंदिरातील शिवलिंग तब्बल दहा हजार लिटर पाण्यात बुडवून पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.
दहा हजार लिटर पाण्यात महादेवाची पिंड; धडगावच्या शेतकऱ्यांचे पावसासाठी अनोखे साकडे
daha-hajar-liter-panyat-mahadevachi-pind-dhadgavchya-shetkaryanche-pavsasathi-anokhe-sakade

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली असली, तरी त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस लांबल्याने शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक श्रद्धेचा आधार घेत महादेवाला जलाभिषेक करून पावसासाठी प्रार्थना केली.

धडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने हा उपक्रम राबविला. महादेवाची पिंड पाण्यात ठेवून पूजा-अर्चा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शिवलिंग पाण्याखाली गेले होते. पाऊस पडावा, शेतीला बळ मिळावे आणि परिसरातील जलस्रोत पुन्हा भरावेत, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा केवळ धार्मिक विधी नसून त्यांच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक ठरला आहे. पावसाअभावी निर्माण झालेली चिंता दूर व्हावी आणि लवकरच दमदार पाऊस बरसावा, यासाठी ग्रामस्थांनी महादेवाकडे साकडे घातले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250