देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना

नंदुरबार:-येथील श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
देवरे विद्यालयात शालेय आरोग्य तपासणी संपन्न, दीर्घ आजारांचे विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना
devare-vidyalaya-school-health-checkup-students-referred-district-hospital-for-further-treatment

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या तपासणीत आरोग्य पथकातील प्रमुख डॉ.सुजाता दहिवेलकर आणि डॉ.सुशीलकुमार मराठे यांनी सर्व विद्यार्थ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली. तपासणीदरम्यान 11 विद्यार्थ्यांमध्ये काही त्रास आढळल्याने त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे संदर्भित करण्यात आले. तर किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांना परिचारिका ममता पावरा यांनी जागेवरच औषधोपचार दिले.
यावेळी डॉ. दहिवेलकर यांनी विद्यार्थिनींना किशोरवयीन आरोग्य आणि मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची स्वच्छता व काळजी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: