अकोला कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजुरांना नियमित करण्याबाबत नियमानुसार कार्यवाहीचे निर्देश
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ, अकोला येथील बारमाही रोजंदारी करणाऱ्या मजुरांना नियमित करण्याबाबत सर्व बाबी तपासून नियमानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात याबाबत आयोजित बैठकीत दिले.
मंत्री भरणे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील बारमाही रोजंदारी करणाऱ्या मजुरांची २०२५ मधील प्रचलित भरती प्रक्रिया, कर्मचारी योजना तसेच वेतन निश्चितीबाबत तपासणी करण्यात यावी. संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

