प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा; जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागप्रमुखांना निर्देश.
आपले सरकार पोर्टल : प्रलंबित सर्व प्रकरणांचा तातडीने निपटारा करून कोणतेही प्रकरण विनाकारण प्रलंबित ठेवू नये.
NCST संदर्भ : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून प्राप्त संदर्भांवर तातडीने कार्यवाही करून निर्धारित कालावधीत निर्गत करावे.
आमदार/खासदार संदर्भ : मा. आमदार व मा. खासदारांकडून प्राप्त संदर्भांना प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करावी.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे : प्रलंबित प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करून तातडीने निकाली काढावे.
AgriStack : निर्धारित उद्दिष्ट १०० टक्के मुदतीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
वन हक्क धारकांचे ७/१२ उतारे : वनपट्ट्यांच्या जमिनींचे ७/१२ उतारे तयार करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
७E/१२E : वन हक्क धारकांच्या जमिनींसंदर्भातील आवश्यक ७E/१२E तयार करण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे.
रोजगार हमी योजना : पात्र लाभार्थ्यांना मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
३०० कोटी वृक्ष लागवड योजना : विभागनिहाय उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण करून प्रत्यक्ष लागवड व नोंदणीची कार्यवाही वेळेत करावी.
सर्व विभागप्रमुखांनी वैयक्तिक लक्ष देऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

