विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान – मुख्यमंत्री फडणवीस
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास जय वकील फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, एसीईसीएफचे सह संस्थापक अमित चंद्र, जय वकील फाऊंडेशनच्या अध्यक्ष व संचालक डॉ. अनायता हेगडे, बजाज फिनसर्व्हच्या अध्यक्षा शेफाली बजाज, एचटी पारेख फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ गुणांवर न होता, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजात समरस होण्याची क्षमता यावर होते. सर्व शाळांमध्ये ‘दिशा’ अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 450 हून अधिक शाळा, 2700 हून अधिक शिक्षक आणि 21 हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षम विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत. या मुलांना वैज्ञानिक आणि नव्या अध्यापन तंत्राच्या आधारे शिक्षण देण्यासाठी लागणारी साधनसामग्री या उपक्रमामुळे उपलब्ध झाली आहे.

