जिल्हास्तरीय सल्लागार समिती (DLCC) बैठक संपन्न; बँकिंग सुविधांचा विस्तार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (DLCC) बैठक जिल्हाधिकारी **डॉ. मित्ताली सेठी** यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल उपस्थित होते.
बैठकीत CMEGP योजनेची प्रगती, बँकांच्या नवीन शाखांची उभारणी आणि कर्जमाफी आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. CMEGP योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेळेत कर्ज मंजुरी व वितरण होण्यासाठी बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
तसेच जिल्ह्यातील बँकविरहित क्षेत्रांमध्ये नवीन बँक शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाखेसाठी योग्य जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी कंटेनर आधारित किंवा प्रीफॅब्रिकेटेड बँक शाखा सुरू करण्याच्या शक्यतेचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यामुळे जिल्ह्यातील दुर्गम व बँकविरहित भागांमध्ये नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी NABARD, विविध बँकांचे समन्वयक व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील पतपुरवठा वाढविणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व बँकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
Follow Us:

