नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट” विशेष अभियान उत्साहात संपन्न

"ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट" या विशेष अभियानात नंदुरबार जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांचा उत्साहात सहभाग.
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट” विशेष अभियान उत्साहात संपन्न
e-waste-collection-and-responsible-disposal-drive-nandurbar-zp-schools
1. अभियानाचे नाव: “Special Campaign 6 – E-Waste Collection & Responsible Disposal” (Eco Clubs for Mission LiFE अंतर्गत).
2. उद्देश: शाळांमध्ये ई-कचरा व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य संकलन आणि अधिकृत संस्थांमार्फत पुनर्प्रक्रिया (Recycling) करणे.
3. प्रमुख उपक्रम:
o ई-कचरा व्यवस्थापनावर शाळांमध्ये कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे आयोजित करणे.
o विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मदतीने घरातील/शाळेतील निकामी इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षितपणे संकलित करणे.
o इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनावश्यक वापर कमी करणे, दुरुस्ती (Repair) व पुनर्वापर (Reuse) यास प्रोत्साहन देणे.
o संकल्प: प्रत्येक विद्यार्थ्याने “मी ई-कचरा व्यवस्थापनाचा जबाबदार योद्धा आहे!”
( I am an E-Waste Warrior!) असा संकल्प करणे.
4. नोंदणी: शाळांनी उपक्रमांचे फोटो व माहिती भारत सरकारच्या [https://ecoclubs.education.gov.in/](https://ecoclubs.education.gov.in/) या संकेतस्थळावर नोंदवायची आहे.
ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट: स्वच्छ व शाश्वत महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे!
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, संगणक, चार्जर, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु, जेव्हा ही उपकरणे निकामी किंवा जुनी होतात, तेव्हा त्यांची अयोग्य पद्धतीने लावलेली विल्हेवाट पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. हीच गंभीर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यभरातील शाळांमध्ये २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट’ (Special Campaign 6) हे विशेष अभियान आयोजित करण्यांत आले असुन जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत देखील हे अभियान उत्स्फुर्थपणे राबविण्यांत येत आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘Eco Clubs for Mission LiFE’ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये ई-कचऱ्याबद्दल जनजागृती निर्माण करणे हा आहे.
 शाळांमध्ये राबवले जाणारे प्रमुख उपक्रम:
• पर्यावरण प्रबोधन व स्पर्धा: शाळांमध्ये ई-कचरा व्यवस्थापनावर प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यांत आले.
• ई-कचरा संकलन मोहीम: विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आपल्या घरातील व शाळेतील निकामी झालेले चार्जर, जुने फोन, बॅटऱ्या आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलित करतील.
• पुनर्प्रक्रिया (Recycling): संकलित झालेला सर्व ई-कचरा अधिकृत व नोंदणीकृत पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्थांकडे जबाबदारीने सुपूर्द केला जाईल.
• जीवनशैलीत बदल: इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनावश्यक वापर टाळणे, वस्तूंची वेळेवर दुरुस्ती करणे (Repair), पुनर्वापर (Reuse) आणि पुनर्प्रक्रिया (Recycle) यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले जाईल.
 ‘मी ई-कचरा व्यवस्थापनाचा जबाबदार योद्धा आहे!’
“ई-कचरा वेगळा करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया!”
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: