एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा

नंदुरबार:-एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. याच निमित्ताने एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शालेय कामकाज सांभाळत विद्यालयातील शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले.
एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा
eklavya-vidyalayat-shala-sambhalat-vidyarthyanni-shikshakanprati-krutajnata-vyakt-keli-shikshak-din-sajra

भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्  व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर हर्ष तेलंग व प्रतीक पाटील या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महेंद्र गिरासे यांनी विविध प्रसंगांच्या माध्यमातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व तसेच कथांच्या आधारे शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर इयत्ता दहावी तुकडी ब च्या विद्यार्थ्यांनी शालोपयोगी वस्तू व गुलाबपुष्प देऊनअध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा व तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आपल्या गुरुंप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे जयदीप नटावदकर विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, श्रीमती विजया न्हायदे, मोनाली त्रिकाळ, अजित लांडगे, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ, कल्पेश तांबोळी व  शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. प्रेरणा माळी व मित क्षत्रिय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. धनश्री पाटील व मीनाक्षी मराठे या दोघींनी स्वागत सत्काराचे सूत्र सांभाळले तर चैतन्य बागुल याने उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250