वनहक्क समितीसमोर 530 वनदाव्यांची सुनावणी

(शहादा) नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी तहसील कार्यालय, शहादा येथे घेण्यात आली. 🌿
वनहक्क समितीसमोर 530 वनदाव्यांची सुनावणी
forest-rights-committee-hearing-530-forest-claims

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीत एकूण 530 वनदाव्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी दावेदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले तसेच संबंधित प्रकरणांची आवश्यक कागदपत्रे व नोंदी तपासण्यात आल्या.
या वेळी उपवनसंरक्षक संतोष सस्ते, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, अशासकीय सदस्य कांतीलाल पाडवी, उपविभागीय अधिकारी शहादा, तहसिलदार शहादा तसेच जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, जिल्हा व्यवस्थापक प्रकाश गावित, सहाय्यक रोशन चौरे, तालुका व्यवस्थापक राकेश पवार यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व वनहक्क दावेदार उपस्थित होते.
वनहक्क कायद्यांतर्गत पात्र दावेदारांना त्यांच्या हक्कांची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: