जिल्हा सल्लागार समिती (DCC) बैठकीत वित्तीय समावेशनाला गती देण्याचे निर्देश

(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विशेष जिल्हा सल्लागार समिती (DCC) बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 🏦📊 बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026 (PAHSKY), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) तसेच जिल्ह्यातील बँक शाखा विस्ताराच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हा सल्लागार समिती (DCC) बैठकीत वित्तीय समावेशनाला गती देण्याचे निर्देश
district-advisory-committee-meeting

मा. जिल्हाधिकारी यांनी CMEGP अंतर्गत प्रलंबित कर्ज प्रस्तावांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच PAHSKY–2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे e-KYC जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
UBI, PNB, Canara Bank, ICICI Bank, Axis Bank आणि Bank of Maharashtra यांना वाटप करण्यात आलेल्या बँकविरहित गावांमध्ये नवीन बँक शाखा सुरू करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
RBI च्या नवीन Lead Bank Scheme नुसार प्रत्येक बँकेने आपल्या Regional/Administrative Office मधून वरिष्ठ अधिकाऱ्याची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, श्री. पंकज पटले (IAS), LDM श्री. नंदकुमार पैठणकर, DDM NABARD श्री. रविंद्र मोरे, GM DIC श्री. निलेश गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
वित्तीय समावेशन, कर्जप्रवाह आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी बँका व शासकीय यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: