महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला नवी गती; ‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’चा प्रस्ताव
जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची संधी आहे या भागीदारीला नवी गती देण्यात येईल, असे सांगत राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संधींचे प्रत्यक्ष प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि सामायिक समृद्धीत रूपांतर करण्यासाठी ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी, उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे उपमहावाणिज्यदूत ख्रिश्चन जॅक, इडन ब्रू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब ब्राऊन, न्युवेरा बायो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लुसी सेमेनेक, हायजीन रिन्यूएबल्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईस ब्राऊन, ऑस्ट्रेलियाच्या जनुक तंत्रज्ञान नियामक कार्यालयाच्या मिशेल वूस्टर आणि ऑस्ट्रेलियाच्या अन्न मानके कार्यालयाच्या गायत्री सुब्रमण्यम उपस्थित होत्या.

