लांजाआरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचामृतदेह
प्राप्त माहितीनुसार मयूर जाधव यांच्या कमरेखालील शरीराची संवेदनशीलता कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच पाली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. दरम्यान शुक्रवारी दुपारी तो घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता.बराच वेळ तो परत आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध सुरु केला शोध मोहीमे दरम्यान वाडीतील मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीत मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला तत्काळ बाहेरून काढून रुग्णवाहिकेतून लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी विजय तुकाराम जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 नुसार आकस्मिक मृत्यूची (रजि.नं 51/2026) नोंद केली आहे घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार (ब.नं 409) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

