मनमाड येथे‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम, नगरपरिषदेच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक : मनमाड नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना विविध नागरी सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी नगरपरिषदेच्या विविध योजना व सेवांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले.
मनमाड येथे‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम, नगरपरिषदेच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन
manmad-municipal-council-services

जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक, नगरपालिका गणेशकुंड मंडळ, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘लोकसंवाद-२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील, पोलीस निरीक्षक विजय करे,  जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रविण बावा, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत धिंगाण, राजेंद्र धिंगाण यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

विज्ञापित

मुख्याधिकारी चौधरी म्हणाले की, नगरपरिषदेमार्फत नागरिकांना दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, विविध प्रकारचे दाखले, कर आकारणी तसेच इतर नागरी सेवांचा समावेश आहे. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार संबंधित विभागाशी संपर्क साधून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा. नगरपरिषदेच्या सेवांबाबत काही अडचणी किंवा शंका असल्यास संबंधित विभागाकडून आवश्यक माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी सेवांची माहिती पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मनमाड येथे नगरपरिषदेच्या विविध सेवा व योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्यास त्याचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांना घेता येतो. यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेच्या विविध योजना, सेवा आणि सुविधांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि नागरिकांशी संबंधित विविध सेवांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असून, गणेश मंडळे आणि नागरिकांनी या जनजागृती उपक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: