प्रकाशा येथे नाबार्डच्या ‘रुटागे स्मार्ट व्हिलेज सेंटर’चा शुभारंभ
केंद्राचे उद्घाटन नाबार्डचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. सूद यांनी हायब्रीड पद्धतीने केले. यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शेतीतील अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. रवींद्र पी. मोरे यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील हे पहिले RSVC केंद्र प्रकाशा येथे स्थापन झाले आहे. केंद्राच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
BAIF चे व्यवस्थापक श्री. देवेंद्र पाटील यांनी केंद्रात उपलब्ध विविध तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.कार्यक्रमास १३० हून अधिक शेतकरी तसेच १० गावांतील PACS अध्यक्ष, विविध बँका, KVK, ATMA, ग्रामपंचायत व इतर संस्थांचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

प्रकाशा RSVC हे नंदुरबार जिल्ह्यात स्मार्ट कृषी, ग्रामीण नवसंशोधन आणि शेतकरी सक्षमीकरणाला चालना देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.


