नंदुरबारात 23 व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा थरार!

नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मैदानावर 5 ते 7 सप्टेंबर 2026 दरम्यान 23 वी राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशन व नंदुरबार जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत 21 वर्षांखालील मुले-मुलींच्या गटातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून जवळपास 800 युवा खेळाडू सहभागी झाले आहेत.
नंदुरबारात 23 व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा थरार!

स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी होत्या. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतः धनुष्यबाण मारून स्पर्धेची सुरुवात केली. सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांनी आत्मविश्वासाने उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेमुळे नंदुरबारच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळत असून, युवा खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
अचूक नेमबाजी, आत्मविश्वास आणि विजयाची जिद्द घेऊन युवा धनुर्धर सज्ज!

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250