रत्नागिरीत झालेल्या रग्बी स्पर्धेत जि.प.ओझर नं 1 शाळेच्या खेळाडूंचा डंका जिल्ह्यात प्रथम व सांगली विभागीयसाठी निवड

रत्नागिरी:-नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत राजापूर तालुक्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. रग्बी असोसिएशन राजापूर आणि जिल्हा परिषद शाळा ओझर नं.1 च्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुयश संपादन केले आहे.
रत्नागिरीत झालेल्या रग्बी स्पर्धेत जि.प.ओझर नं 1 शाळेच्या खेळाडूंचा डंका जिल्ह्यात प्रथम व सांगली विभागीयसाठी निवड
ozar-school-rugby-victory-ratnagiri

14 वर्षांखालील मुलींच्या गटात राजापूरच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून या संघाची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू दुर्वा मंगेश गुरव (कर्णधार), पल्लवी पांडुरंग मालपेकर (उपकर्णधार), दुर्वा सतीश रेगे, वैदेही योगेश नवलू, श्रुती नरेश पळसमकर, अनन्या विवेक रेगे, उर्वी अनंत गोसावी, रिया प्रकाश नवलू, काव्या उमेश रांबडे, आरोही संजय नवलू. तर 14 वर्षांखालील मुलांच्या गटातून साई राजेश गुरव याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे, पालकांचे आणि मार्गदर्शक प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना जिल्हा प्रमुख प्रशिक्षक डॉ. योगिता खाडे, राजापूर तालुका प्रमुख प्रशिक्षक युवराज मोरे आणि प्रशिक्षक शैलेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: