पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

गुरुवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता नंदुरबार रेल्वे स्थानक येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने सकाळी 7.30 वाजता नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होईल.
सकाळी 10.00 वाजता रंगावली सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पिण्याचे पाणी, गणेश उत्सवाबाबत प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा बैठक तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील प्रशासकीय कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सकाळी 10.30 वाजता रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे पत्रकार परिषद.
सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, नंदुरबार येथून (शहादा -म्हसावद- राणीपूरमार्गे ) तोरणमाळ ता.धडगावकडे प्रयाण करतील. दुपारी 1.00 वाजता तोरणमाळ येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, तोरणमाळ ता.धडगाव येथे विविध पर्यटन स्थळांची पाहणी व तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा सादरीकरण. दुपारी 4.00 वाजता तोरणमाळ, ता.धडगाव येथून (राणीपूर -म्हसावद-शहादा मार्गे) तळोदाकडे प्रयाण. सायंकाळी 05-00 वाजता तहसिल कार्यालय, तळोदा येथे तळोदा तालुका विविध शासकीय विभागाच्या विकास योजनांचा आढावा बैठक. सायंकाळी 6.30 वाजता तळोदा येथून शासकीय विश्रामगृह, नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 8.45 वाजता खान्देश एक्सप्रेसने नंदुरबार रेल्वे टर्मिनस येथून दादरकडे प्रयाण करतील.

