बालकांच्या आरोग्य-पोषणासाठी ICDS विभागाचा आढावा; दुर्गम भागातील सेवांवर विशेष भर

(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ICDS विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. बालकांचे आरोग्य, पोषण आणि अंगणवाडी केंद्रांच्या प्रभावी कार्यवाहीबाबत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बालकांच्या आरोग्य-पोषणासाठी ICDS विभागाचा आढावा; दुर्गम भागातील सेवांवर विशेष भर
Review of ICDS Department for Children's Health and Nutrition; Special Focus on Services in Remote Areas

🔹 VCDC नंतर SAM तसेच NRC मधून डिस्चार्ज झालेल्या बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून आवश्यकतेनुसार VCDC मध्ये दाखल करण्यासाठी नियमित Follow-up घेण्याचे निर्देश.
🔹 CTC सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना.
🔹 दुर्गम पाड्यांचा शोध घेऊन तेथील नागरिकांपर्यंत प्रशासकीय सेवा पोहोचविण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.
🔹 Stuntingबाबत गावस्तरावर अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना.
🔹 अमृत आहार योजनेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.
🔹 ० ते ६ महिने वयोगटातील वजनवाढ न झालेल्या बालकांची यादी सादर करण्याबाबत सूचना.
🔹 Supervisors व CDPO यांच्या अंगणवाडी भेटींच्या अहवालाचा नमुना तसेच SS App संदर्भातील कार्यवाहीचा आढावा.
🔹Mission 201अंतर्गत प्राथमिक चर्चा करण्यात आली.
बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासोबतच दुर्गम भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठीसमन्वयाने व परिणामकारक कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250