‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी अभियान’ला गती!

प्रत्येक ग्रामपंचायतीत कामे सुरू ठेवण्यासोबतच किमान १० मजूर असलेल्या ग्रामपंचायतींचे दैनंदिन मॉनिटरिंग करण्याचे निर्देश देण्यात आले.
जलसमृद्धीला प्राधान्य
कृषी विभागामार्फत अस्तरीकरणाची शेततळी घेऊन शाश्वत जलसाठे व मालमत्ता निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार आहे.
वन विभागाची सक्रिय भागीदारी
प्रत्येक वनक्षेत्रपालाने आपल्या क्षेत्रात किमान ५ पाणलोटाची कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, स्थानिक वनरक्षकांच्या सहकार्याने कामांना गती दिली जाणार आहे.
अंगणवाडी विकासालाही चालना
अंगणवाडी बांधकामांसाठी अभिसरणाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेमार्फत तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मातोश्री शेत/पाणंद रस्ते
मंजूर कामे प्रलंबित राहण्याची कारणे शोधून त्याची पडताळणी करण्याचे निर्देश.
अक्राणी तालुक्यातील CFR क्षेत्रातील प्रलंबित कामांना तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच मजुरांच्या प्रलंबित e-KYC साठी आधार अपडेट व इतर त्रुटी दूर करण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रोजगार, जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून विकसित नंदुरबारकडे वाटचाल!

