एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण SC उमेदवारांना मुलाखतीसाठी १० हजार रुपयांची मदत
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलाखतीच्या तयारीदरम्यान होणाऱ्या विविध खर्चासाठी ही आर्थिक मदत उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बार्टी, पुणे कार्यालयाकडे पोस्ट किंवा कुरियरद्वारे पाठवणे बंधनकारक आहे.
उमेदवारांनी अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८/२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१ या पत्त्यावर पाठवावी.
मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि गुणवंत उमेदवारांना आपल्या तयारीवर अधिक लक्ष केंद्रित करता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ०२०-२६३३३३३० किंवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बार्टी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

