पिंपळखुटा येथे सेवा संकल्प शिबिर व मेगा आधार कॅम्प उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे नागरिकांना विविध शासकीय योजना व आवश्यक कागदपत्रांच्या सेवा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी सेवा संकल्प शिबिर तसेच मेगा आधार कॅम्प आयोजित करण्यात आला.
पिंपळखुटा येथे सेवा संकल्प शिबिर व मेगा आधार कॅम्प उत्साहात संपन्न
pimpalkhuta-seva-sankalp-shibir-aadhar-camp
या शिबिरास मा. अपर जिल्हाधिकारी श्री. गोगटे, अपर तहसीलदार मोलगी श्री. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच सौ. रंजनाताई राऊत, अधिकारी-कर्मचारी, ग्रामसखी, कृषी सखी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजना, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 सेवांचा लाभ :
• 7/12 उतारे – 21
• नमुना 8-अ – 21
• संजय गांधी योजना अर्ज – 5
• शपथपत्र – 4
• आरोग्य तपासणी – 25
• जन्म प्रमाणपत्र – 14
• बोनाफाईड प्रमाणपत्र – 55
• वय व अधिवास प्रमाणपत्र – 55
• उत्पन्न दाखला – 12
• आधार नोंदणी/अपडेट –161
• शिधापत्रिका नाव कमी/समाविष्ट अर्ज – 52
गावातच शासकीय सेवा, नागरिकांना सुलभ सुविधा!
शिबिरामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ झाली.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: