प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – मंत्री पंकजा मुंडे

ठाणे : पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्लास्टिकचा वाढता प्रभाव रोखणे, ही काळाची गरज बनली असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ थांबवण्यासाठी सर्वांच्या एकत्र येण्याची आवश्यकता आहे. प्लास्टिक अमर असले तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने प्लास्टिक पुनर्प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू करण्यात येत आहे.
प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – मंत्री पंकजा मुंडे
Plastic Recycling Citizens Participation Munde

महाराष्ट्रातील १३ ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या ‘महा आर-पेट’ या अभियानाची सुरुवात ठाण्यातून होत असून, असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठाण्यातील हॉटेल विवांतच्या सभागृहात हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महा आर-पेट बॉटल व स्टिकर्स अनावरण आणि उद्घाटन’ प्रसंगी त्या बोलत होत्या.

 

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: