आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ

(नंदुरबार) क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजाती गौरव दिनाचा कार्यक्रम नंदुरबार येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आदिवासी समाजाचे जल, जंगल, जमीन, संस्कृती, परंपरा आणि पारंपरिक हक्कांचे संरक्षण ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ
Protecting tribal water, forests, and land is a collective responsibility: Guardian Minister Hasan Mushrif
           भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेला संघर्ष, आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी केलेले कार्य आणि दिलेले बलिदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा.आमदार आमश्या पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
           ‘वनसंपदा’ डिजिटल पोर्टलचे अनावरण मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या पोर्टलद्वारे आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात आदिवासी शेतकरी, महिला बचत गट, महिला उद्योजक आणि इतर पात्र लाभार्थ्यांना शेती साहित्य, ठिबक सिंचन, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, शिलाई मशीन, वनहक्क पट्टे, महिला शेतकरी प्रमाणपत्रे तसेच विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.
जिल्ह्यातील ₹65 कोटी खर्चाच्या 7 शासकीय इमारतींचे लोकार्पण मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यामध्ये इच्छागव्हाण, बोरद, दहेल आणि रोषमाळ येथील आश्रमशाळा, शालेय इमारती व मुला-मुलींच्या वसतिगृहांचा समावेश आहे. या सुविधांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गटांचे स्टॉल तसेच विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
आदिवासी समाजाचे हक्क, अस्मिता आणि सर्वांगीण विकासाला बळ देणारा जनजाती गौरव दिन नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: