सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका! एका क्लिकने होऊ शकते आर्थिक फसवणूक!

नंदुरबार सायबर पोलीस स्टेशन च्या पथकाद्वारे शाळेतील विद्यार्थिनींना सायबर क्राईम व सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीपर माहिती देण्यात आली.
सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका! एका क्लिकने होऊ शकते आर्थिक फसवणूक!
social-media-offer-fraud-warning

यावेळी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली होणारी ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, बनावट प्रोफाइल, संशयास्पद लिंक, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि दैनंदिन घडणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कशी नोंदवावी, याचीही माहिती देण्यात आली.

लक्षात ठेवा!
  •  कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
  •  OTP व पासवर्ड कोणालाही सांगू नका.
  •  ऑनलाइन खरेदीपूर्वी वेबसाइटची सत्यता तपासा.
  •  सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या.
  •  सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.
  •  सायबर सुरक्षिततेसाठी जागरूकता हीच प्रभावी सुरक्षा!
  •  जागृत रहा | सतर्क रहा | सायबर सुरक्षित रहा!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: