आरोग्य विभागाची साप्ताहिक आढावा बैठक

( नंदुरबार) जिल्हाधिकारीडॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकानिहाय आरोग्य सेवांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आरोग्य विभागाची साप्ताहिक आढावा बैठक
The weekly review meeting of the Health Department
        बैठकीत माता-बालमृत्यू (MDR/CDR), असंसर्गजन्य आजार (NCD), सिकलसेल तपासणी मोहीम, आरोग्य सुविधांच्या पायाभूत बाबी, NQAS, MJPJAY/PMJAY, RBSK, अतिजोखमीच्या माता, संस्थात्मक प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि बाल उपचार केंद्र (CTC) या विषयांवर चर्चा करण्यात आली.
        आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच निर्देशांची पूर्तता करून अद्ययावत माहिती व प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: