नंदुरबारात मंदिरात चोरी; १ लाख २० हजारांचा ऐवज लंपास
नंदुरबार शहरातील रामदूत हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी मंदिराचे लोखंडी गेट तोडून दानपेटी फोडली.
मंदिरातील चांदीचे मुकुट, छत्री, घंटा, पादुका, वाटी, कमरपट्टा, कर्णफुले व इतर वस्तूंसह एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
