आरोग्य सेवांचा साप्ताहिक आढावा; सिकल सेल तपासणीसह बालआरोग्यावर विशेष भर

(नंदुरबार) जिल्ह्यातील आरोग्य सेवा, सिकल सेल नियंत्रण, बालआरोग्य व पोषण तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रभावी आरोग्य व प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठीयांच्या अध्यक्षतेखाली साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली.
आरोग्य सेवांचा साप्ताहिक आढावा; सिकल सेल तपासणीसह बालआरोग्यावर विशेष भर
Weekly review of health services; special emphasis on child health, including sickle cell screening.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांची, विशेषतः सिकल सेल वाहक अथवा पीडित व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांची युद्धपातळीवर सिकल सेल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. नवजात बालकांची सिकल सेल तपासणी न चुकता करून त्याचा दररोज आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
👶 जिल्ह्यातील जन्म, गृहप्रसूती, बालमृत्यू, अर्भक मृत्यू व मातामृत्यू तसेच संबंधित शवविच्छेदनाच्या बाबींचा साप्ताहिक आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले.
🔹201 गावांसाठी Template, SOP व Action Plan तयार करणे.
🔹 VCDC व NRC मधून डिस्चार्ज झालेल्या SAM बालकांची MO मार्फत आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार VCDC मध्ये दाखल करण्यासाठी नियमित Follow-up घेणे.
🔹 CTC सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणे.
🔹 दुर्गम पाड्यांचा शोध घेऊन प्रशासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रस्ताव सादर करणे.
🔹 Stunting संदर्भात अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन अहवाल सादर करणे.
🔹 अमृत आहार योजनेत आवश्यक सुधारणाकरण्याबाबत प्रस्ताव सादर करणे.
🔹 0 ते 6 महिने वयातील वजनवाढ न झालेल्या बालकांची यादी सादर करणे.
🔹 मोठ्या व दुर्गम बीटच्या प्रभावी सनियंत्रणासाठी आवश्यक पर्यवेक्षिकांची अतिरिक्त संख्या कळविणे.
🔹 अंगणवाडी भेटीचा अहवाल नमुना तसेच SS App बाबत आवश्यक कार्यवाही करणे.
🤝 बैठकीतील निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्य व पोषणामध्ये सकारात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250