दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची पर्वणी; ‘मऱ्हाटी एम्पोरियम’मध्ये १५ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन-विक्री

गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेशमूर्तींची पर्वणी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्‍हाटी एम्पोरियम’ मध्ये दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.
दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची पर्वणी; ‘मऱ्हाटी एम्पोरियम’मध्ये १५ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन-विक्री
A treat for eco-friendly Ganesh idol enthusiasts in Delhi; exhibition and sale at ‘Marathi Emporium’ until September 15.

भारत सरकारच्या सह महालेखानियंत्रक सुप्रिया देवस्थळी यांच्या हस्ते या प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, गणेशमूर्ती कलाकार सपना जाधव, वीणा भाट आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पारंपरिक मूर्तीकलेला प्रोत्साहन देतानाच दिल्लीतील गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून दिल्लीमध्ये गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, हा उपक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचा राजधानीत सातत्याने परिचय करून देत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250