‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत बिलगाव येथे ३९१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
नंदुरबार जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत मंडळ-सेलमाळ बु. (बिलगाव) येथे विविध योजनांच्या माध्यमातून एकूण ३९१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.यामध्ये आरोग्य विभागाच्या माता तपासणी, पशुसंवर्धन विभागाची तपासणी, पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड, तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंचायत समिती व महसूल विभागामार्फत विविध योजना माहिती, जन्म-मृत्यू दाखले, विवाह दाखले, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले आणि इतर विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) उपस्थित होत्या. नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
Follow Us:

