चांदीच्या बांगड्या पॉलिशच्या बहाण्याने लंपास; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : चांदीच्या बांगड्यांना पॉलिश करून देतो, असे सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या हातातील बांगड्या लंपास केल्याची घटना नांदुरखेडा येथे घडली. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदीच्या बांगड्या पॉलिशच्या बहाण्याने लंपास; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
chandichya-bangdya-polishchya-bahanayane-lampas-doghaviruddh-gunha-dakhal

नांदुरखेडा येथील कृष्णा गोकुळ बोरेसे यांच्या आईच्या हातातील चांदीच्या बांगड्या पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघांनी फसवणूक केली. दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी महिलेशी संपर्क साधत चांदीच्या बांगड्या पॉलिश करून देतो, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने बांगड्या त्यांच्याकडे दिल्या.

या बांगड्यांची किंमत सुमारे १५ हजार ६०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बांगड्या पॉलिश करण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यातील चांदी काढून घेतली आणि तेथून पसार झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा गोकुळ बोरेसे यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रमेश कडवे करीत आहेत. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून, नागरिकांनी अशा प्रकारे घरी येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250