मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील नांदगांव (वाढवण परिसर) आणि दिघी येथे शिपयार्ड विकसित करण्याबाबत बैठक घेतली.

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून राज्याला जागतिक मेरीटाईम हब बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, मंत्री […]
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील नांदगांव (वाढवण परिसर) आणि दिघी येथे शिपयार्ड विकसित करण्याबाबत बैठक घेतली.
Fisheries and Ports Minister Nitesh Rane held a meeting regarding the development of shipyards at Nandgaon (Wadwan area) and Dighi in Palghar district.

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून राज्याला जागतिक मेरीटाईम हब बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, मंत्री राणे यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेडचे वेदांत चौधरी आदी उपस्थित होते.