विज्ञापित

गणेशोत्सवाचा गजर असू द्या, पण डीजेचा कर्णकर्कश गोंगाट नको; पर्यावरणपूरक आणि विधायक उत्सवाची गरज

आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषिप्रधान देशात संपुर्ण वर्षभर जे काही सण-उत्सव साजरे केले जातात ते सगळे शेती-मातीशी आणि लोकसंस्कृतीशी निगडीत आहे. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश घेऊन येत असतो.
गणेशोत्सवाचा गजर असू द्या, पण डीजेचा कर्णकर्कश गोंगाट नको; पर्यावरणपूरक आणि विधायक उत्सवाची गरज
ganeshotsav-gajar-dj-noise-free-environment-friendly-and-constructive-celebration

भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून ‘वसुदेव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. यासोबतच आपण साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, धर्मकारण, उद्योग, राजकारण या सगळ्या क्षेत्रात खूप चांगली प्रगती करत आहोत. राष्ट्रीय सण-उत्सव साजरे करण्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते, राष्ट्रपुरुषां विषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच भावी पिढीला त्याग, बलिदान,जबाबदारी, कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता रुजवण्याचे, संस्कार करण्याचे काम होत असते. सार्वजनिक-राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना, परस्परांवरील विश्वास, प्रेम आणि कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्या करिता, निसर्गाप्रति उपकृत होत विविध सण आणि ऊत्सव मोठ्या उत्साहाने,आनंदाने देशभर साजरे केले जातात. तसाच सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव एका चांगल्या विधायक उद्देशाने, देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून १८९३-९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. गणेशभक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यंक्रमाचीं सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वंजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला.यातून तरूणांचे देशाप्रती प्रेम,समाजाप्रती करुणा निर्माण होत गेली. समाजसेवेत, देशभक्तीत आणि राष्ट्रसेवेत यामुळे वाढ होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी, हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निघडया छातीच्या तरुण मुलां-मुलींची देशाभिमानी पिढी तयार झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले त्यासोबतच विविध प्रबोधनपर जागृतीच्या कार्यंक्रमाचे आयोजनही करण्यात येऊ लागल्याने अंघश्रद्धा, बुबावाजी व्यसनमुक्ती, लोकशिक्षण, निसर्ग संवर्धन, सामाजिक एकता, बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणशोत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे.

विज्ञापित

मेळा हा गणेशोत्सवा मधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाप्रकारातून समाजातील बदल,घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडल्या जायच्या. लोकोपयोगी विषय निवडून जागृती करणारे कार्यक्रम सादर केल जात, पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी, बतावणी, प्रहसन, एकांकिका असे भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केल्या जायचे. खास करून ग्रामीण भागात गणेशोत्सवाची यासाठी वाट पाहिली जायची. आज अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध असले तरी…त्याकाळी मेळ्याने केलेली सांस्कृतिक मशागत खुपच परिणाम आणि परिवर्तन करणारी ठरत होती. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही.. उत्सवा दरम्यान गणेश मंडळा कडून विद्यार्थी मुली मुलांसाठी तसेच महिला करिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. खरं म्हणजे शेतात राबणाऱ्या एखाद्या शेतकरी महिलेला यानिमित्ताने खेळांच्या स्पर्धेत सहभाग घ्यायची या निमित्ताने संधी मिळायची… एखादी मुलगी चांगली रांगोळी काढायची, एखादा मुलगा उत्तम चित्र काढायचा. तर मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फुर्तपणे भाग घ्यायचे पुढे हेच विद्यार्थी मग महाविद्यालयात मोठया स्पर्धा गाजवत. मिळालेल्या बक्षीसाची प्रेरणा घेऊन ते विद्यार्थी पुढे खूप मोठी प्रगती करतांना दिसायचे.

     गणेशोत्सवाच्या मुख्य उद्देशाला लक्षात घेऊन प्रबोधनजागृती करण्यासाठी या उत्सवाचा उपयोग झाला पाहिजेआज जरी आपला देश स्वतंत्र असला,प्रगती करत असला तरी सामाजिक समस्या कमी झाल्या नाहीतत्यामुळे उत्सवात केवळ मूर्तींची उंची कुणाची मोठीयापेक्षा पर्यावरणपूरकनिसर्गाचे संवर्धन करणाराप्रदूषणविरहितनिर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या ऊत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव आणखी चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येऊ शकतोयाचा विचार करणे काळाची गरज आहेसगळ्यात महत्त्वाचे कर्णकर्कश डीजेचा ध्वनिप्रदुषण टाळून पारंपारिक वाद्य मृदुंगढोलतासेलेझीम वापरले तर ते या उत्सवाची शान वाढवणारे ठरेलसार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगीसामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवले तर ज्या क्रांतीकारी उद्देशासाठी गणेशोत्सव सुरू केला होतात्याची उपयुक्तता आणि वाटचाल कालसंगत टिकून राहीलयाच दरम्यान गौरीचे आगमन होत असतेत्यांना ‘महालक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जातेमहाराष्ट्रासह वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे आगमन होतेघराघरात त्यांचे आगमनपूजनविसर्जन असा सोहळा केल्या जातोमोठ्या उत्साहाने महिला त्यांच्यासाठी मखरसजावटदेखावा करण्यात दंग असतातया सोहळ्यात देखील आपण आपल्या इतिहासातील पराक्रमीशूरवीर महिलांची माहिती आजच्या तरुण मुलीं पर्यंत पोहचवली तर त्यांची कठीण प्रसंगीसंकटात धर्याने उभे राहण्याची हिम्मत वाढेलया पर्वणीच्या निमित्ताने आधुनिक काळात महिलामुलींच्या हिताचेस्वरक्षंणाचेस्वालंबी करणाऱ्या उपक्रमाचा समावेश करता आला तर खऱ्या अर्थाने गौरीच्या आगमनाचाही चांगला उपयोग होईल.

    आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असतेसमानताएकताआनंदनिसर्गाप्रति कृतज्ञताआंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टीकोन असलेले सण आम्हा भारतीयांची राष्ट्रीय भावना जागृत करणारेउज्वल भविष्याकरीता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे उर्जाकेंद्र आहेतसणउत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहात साजरे करणे ही मानवी मनाचीसमाजाची एक सांस्कृतिक भूक आहेही भूक भागवल्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपुर्णता येते असतेसणाच्या निमित्ताने व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीयमित्रनातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची भेटण्याची नामी संधी मिळत असतेमाणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे तसेच आपले सणउत्सव आनंदाने साजरे करून एकात्मताबंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.

    गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जनाचा मोठा जल्लोष असतोमहाराष्ट्राला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेले आहेम्हणून उत्सवमिरवणूक असो की समारंभ आनंदच्या कोणत्याही प्रसंगी पूर्वी टाळमृदंगढोलकीहलगीडफडेढोल वाजवून किंवा शहनाईलेझीम पथक या सारखे पारंपरिक वाद्य वापरुन तो उत्सव मोठ्या थाटात साजरा केल्या जायचात्यात एक नादमाधुर्यगोडी असायची त्यामुळे ते सगळे ऐकायलाबघायला खूपच आल्हाददायकसुखावणारे आणि प्रेरणादायी वाटायचेआजही आपल्याला त्याची आठवण सुखद अनुभव देत असतेगणेशोत्सव असो की महापुरुषांची जयंती अगदी डोक्यावर मूर्तीप्रतिमा घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर गातनाचत विसर्जनमिरवणूक उत्साहात व्हायच्याहल्ली आश्या कार्यक्रमाच्या प्रसंगी डीजे डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजात हे सणउत्सव साजरे होऊ लागल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत्यामुळे उत्सवातील गोडवामधुरता जाऊन त्याठिकाणी प्रदूषणगोंगाटउथळपणा वाढवून अनेक सामाजिक समस्यासह आरोग्याच्या संबंधित अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेआणि मूर्तींची उंची वाढवून केवळ दीखाऊपणा केल्याने गणेशोत्सवाचा उद्देश साध्य होतांना दिसत नाहीहाच चिंतेचा आणि चिंतानाचा विषय आहेउत्साहाच्या भरात आणि उन्मादाच्या जोशात आनंदाचाऊत्सवाचा प्रसंग एखाद्याच्या जीवनाचा शेवटचा क्षण ठरू पाहत आहे…

   आजच्या वास्तव परिस्थितीचा अचूक अंदाज जर्मनीचे नोबेल पारितोषिक विजेते व प्रसिद्ध जीवाणू तज्ञ होते १९०५ मध्ये रॉबर्ट कोच यांना तेव्हाच आला होता..त्यांनी असे भाकीत केले होते

एक दिवस असा येईल कि जेव्हा ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या रोगांचा आपल्या भोवती फास असेलया रोगांशी लढणं तितकच अवघड असेल जितकं गेल्या शतकात प्लेग किंवा कॉलराशी लढणं अवघड होतं” यावरून आपल्याला ध्वनी प्रदूषणाच्या आजच्या संकटाची तीव्रता लक्षात येते. मनुष्यप्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादे पलीकडील असाह्य ध्वनी म्हणजे ‘ध्वनी प्रदूषण’ होयआपल्या देशात १२५ डेसिबल्स पेक्षा जास्त मोठ्या आवाज करणाऱ्या फटक्यावरही बंदी घातलेली आहेजागतिक आरोग्य संघटनेणे ६५ डेसिबल्स इतका आवाज सार्वजनिक ठिकाणी निर्धारित केलेला आहेपण नियमाला कायमच केराची टोपली दाखवून लोक उत्सवाच्या नावाखाली खुलेआमदिवसा ढवळ्या त्याची पायमल्ली करतातध्वनीप्रदूषणामुळे लोकांच्या मानसिक आणि शाररीक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम होत आहेरक्तदाब वाढणेहृदयरोग एवढेच काय तर गर्भवती महिलानां गर्भपाता सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेसाधारण ८० डेसिबल्स इतका आवाज आठ तासापेक्षा जास्त आपल्या कानावर येत राहिला तर सामान्य व्यक्तीला बहिरेपणा येण्याची शक्यता अधिक असतेहोते काय किरक्तदाबहृदयगतीरक्तवाहिन्या संबंधीचा आणि रक्त घट्ट करणारे मज्जातंतू संप्रेरक सक्रीय करून शरीर उच्च आवाज पातळीला प्रतिसाद देते म्हणून प्रभावित लोकांना हे माहितही नसतेकि आपली कशी आणि किती हानी झालीकालांतराने मग त्याचे परिणामच भोगावे लागतातमाणसं तर माणसं पण पशुपक्षीप्राणी यांच्यावर देखील डीजे डॉल्बीचा विपरीत परिणाम झाला आहेकाही पशुप्राणी या आवाजामुळे आपली अधिवासाची जागाच बदलतात तर या सगळ्या गोंगाटामुळे अतिशय सुंदरमंजुळआवाजात दिवसा गाणारे पक्षी आता तो रात्रीच्या वेळीं गात आहेतम्हणूनच आपल्याला त्यांचा मधुर स्वर हल्ली ऐकायला मिळत नाही.

    पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५ अन्वये ध्वनीप्रदुषणाची मर्यादा ओलांडली तर त्यासाठी ५ वर्षाची शिक्षेची तरतूद केलेली आहेहे जरी सगळे खरे असले तरी मनाला आवर घालूनसंपूर्ण सजीवांचे प्रंचड नुकसान करणाऱ्या डीजेच्या कर्णकर्कश जीवघेण्या आवाजाला थांबवणे काळाची आवश्यक आहेमहत्वाचे म्हणजे आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहेनिसर्ग निर्मित अनेक संकटे मानव जातीवर आक्रमण करत आहेतच त्यात डिजे डॉल्बीच्या ध्वनी प्रदूषणाचे मानव निर्मित संकट आपणच निर्माण करतोयआपल्याला प्रत्येकाला जगण्याचाआयुष्याचा निर्भेळ आनंद घ्यावयाचा असेल तर कर्ण कर्कश डीजेला हात जोडून रामराम ठोकण्याशिवाय कुठलाच पर्याय नाहीयातच मानवाचेपशुपक्षी आणि प्राण्याचे एकूण जीवसृष्टीचे हित सामावलेले आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: