निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन
या कार्यशाळेत निवृत्ती वेतन धारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपचे मिळणार मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्य शासनाने निवृत्ती वेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे विशेषृत मोबाईल ॲप विकसीत केले आहे. या ॲपच्या माध्यमातून निवृत्ती वेतनधारकांना घरबसल्या मासिक व वार्षिक निवृत्ती वेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला आणि फॉर्म नं. 16 यांसारख्या सुविधा मोबाईलवरच उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, याद्वारे हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यशाळेत या ॲपविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी येताना आपला पी.पी.ओ. (PPO) क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सोबत घेऊन यावा. सर्व निवृत्ती वेतनधारकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. सं. म. खडसे यांनी केले आहे.

