विज्ञापित

घरच्या घरी मशरूम शेतीचा अनोखा प्रयोग; दिलीप तडवींच्या उपक्रमाला वाढता प्रतिसाद

तळोदा : पारंपरिक शेतीला पर्याय देत कमी जागेत आणि कमी खर्चात उत्पन्नाचा नवा मार्ग शोधत तालुक्यातील बेलापाडा येथील रहिवासी दिलीप तडवी यांनी घरच्या घरी मशरूम शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमातून परिसरातील नागरिकांना ताजे मशरूम उपलब्ध होत असून, मागणी वाढत असल्याने मशरूम उत्पादनाची व्याप्तीही त्यांनी वाढवली आहे.
घरच्या घरी मशरूम शेतीचा अनोखा प्रयोग; दिलीप तडवींच्या उपक्रमाला वाढता प्रतिसाद
home-mushroom-farming-unique-experiment-dilip-tadvi-initiative-gains-growing-response

    मशरूम शेतीला सुरुवात करण्यापूर्वी तडवी यांनी कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर मशरूम उत्पादनाचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी नाशिक येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून मशरूमचे विविध प्रकार, उत्पादनाची पद्धत, आवश्यक साहित्य, तापमान व जागेचे नियोजन याबाबत त्यांनी माहिती घेतली आणि प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात केली.

विज्ञापित

    सुरुवातीला दररोज एक ते दोन किलो मशरूमचे उत्पादन होत होते. मात्र, परिसरातील नागरिकांकडून मागणी वाढू लागल्यानंतर तडवी यांनी मशरूमच्या बेडची संख्या हळूहळू वाढवली. सध्या त्यांच्या घरगुती प्रकल्पात दोनशेहून अधिक मशरूम बॅग असून, दररोज सुमारे १५ ते २० किलो मशरूमचे उत्पादन घेतले जात आहे.

    या उपक्रमात तडवी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा हातभार लागत आहे. घरातील उपलब्ध जागेचा योग्य वापर करून त्यांनी रोजगाराचे नवे साधन निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, परिसरातील होतकरू तरुणांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे.

    कमी जागेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मशरूम शेती करता येते, हे त्यांच्या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उपक्रमामुळे तळोदा तालुक्यात मशरूम उत्पादनासाठी नवी बाजारपेठ निर्माण होण्याची शक्यता असून, इतर शेतकरी व तरुणांनाही या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: