‘जन्मशताब्दी एक्स्प्रेस’ला विलवडे स्थानकावर थांबा द्या; चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळाची मुख्यमंत्री व उदय सामंत यांच्याकडे मागणी

मुंबई:-जन्मशताब्दी एक्स्प्रेस 12051 (मुंबई-मडगाव सकाळी 11.30) आणि जन्मशताब्दी एक्स्प्रेस 12052 (मडगाव-मुंबई सायं 17.50) या गाडीला विलवडे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळ मूर मुंबई यांच्या वतीने ना.उदयजी सामंत (उद्योगमंत्री आणि पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा) तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले
‘जन्मशताब्दी एक्स्प्रेस’ला विलवडे स्थानकावर थांबा द्या; चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळाची मुख्यमंत्री व उदय सामंत यांच्याकडे मागणी
jan-shatabdi-express-vilavade-stoppage

लांजा, राजापूर तालुक्यातील विलवडे स्थानकाच्या आसपासच्या 70 ते 80 गावातील चाकरमानी प्रवासी दररोज मोठ्या संख्येने विलवडे ते मुंबई व मुंबई ते विलवडे असा प्रवास करत असतात जन्मशताब्दी एक्स्प्रेस ही एक महत्त्वाची गाडी असून जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव जंक्शन अशी रोज धावते विलवडे रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा दिल्यास स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना रोजच्या रोज प्रवास करता येईल व वेळही वाया जाणार नाही आपण ही जनसमस्या सोडवून जन्मशताब्दी एक्स्प्रेसला विलवडे रेल्वे स्थानकावर थांबा मिळवून द्यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: