‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’! ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. यानिमित्त गेल्या वर्षीच्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा कार्यालयांचा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’! ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
mazi-anganwadi-mazi-jababdari-9vya-rashtriya-poshan-mahacha-rajyastariya-shubharambh-utkrusht-kamgiri-karanaryancha-sanman

पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्‍युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250