मिशन 201 : डेटाच्या आधारे गावविकासाला मिळणार गती

(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या उपस्थितीत “मिशन 201” अभिमुखता व चर्चा बैठक संपन्न झाली. नंदुरबार जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष आवश्यक असलेल्या 201 गावांची डेटा-आधारित निवड करण्यात आली आहे.
मिशन 201 : डेटाच्या आधारे गावविकासाला मिळणार गती
mission-201-datya-aadhare-gaav-vikasala-gati

आरोग्य , पोषण , शिक्षण , पाणी व स्वच्छता , उपजीविका आणि सामाजिक विकास या विविध निर्देशांकांच्या आधारे प्रत्येक गावाची सद्यस्थिती समजून घेऊन गरजेनुसार नियोजन व कृती केली जाणार आहे.
या उपक्रमाच्या नियोजनात 20 स्वयंसेवी संस्था, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
मिशन 201 अंतर्गत शासन विभाग, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत आणि समुदाय यांना थेट जोडून समस्या ओळखणे, डेटा पडताळणी, गावभेटी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि नियमित प्रगती मोजमापावर भर दिला जाणार आहे.
महत्त्वाचे टप्पे :
सप्टेंबर अखेर – सरपंच परिषद
2 ऑक्टोबर – मिशन 201 चे औपचारिक लोकार्पण
1 ते 15 ऑक्टोबर – सर्वेक्षण व गावभेटी
15 नोव्हेंबरपर्यंत – पहिली गावनिहाय प्रगती क्रमवारी
“डेटातून समस्या ओळखणे, गावापर्यंत पोहोचणे आणि प्रत्येक समस्येवर कृती घडवून आणणे” हे मिशन 201 चे प्रमुख ध्येय आहे. सामूहिक प्रयत्नांतून निवडलेल्या प्रत्येक गावात मोजता येईल असा सकारात्मक बदल घडविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250