विज्ञापित

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात AI प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न !

( नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी Artificial Intelligence (AI) Awareness & Practical Workshop या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात AI प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न !
nandurbar-collector-office-ai-training-workshop

कार्यशाळेत AI Expert व Digital Transformation Consultant श्री. विनायक कदम, Founder – VKCL यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्रात Artificial Intelligence, Generative AI, आधुनिक AI Tools, Prompt Writing Techniques तसेच शासकीय प्रशासनातील AI चा वापर याबाबत माहिती देण्यात आली.
दुसऱ्या सत्रात शासकीय दस्तऐवज निर्मिती, Data Analysis & Reporting, विविध AI Use Cases आणि Hands-on Practical Exercises घेण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले.
दैनंदिन शासकीय कामकाजात AI चा प्रभावी, कार्यक्षम आणि जबाबदार वापर कसा करता येईल, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे कामकाजातील उत्पादकता वाढविणे, वेळेची बचत, दस्तऐवज व अहवाल निर्मिती सुलभ करणे आणि डिजिटल परिवर्तनाला गती देणे यासाठी AI च्या वापराबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: