शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रशासनाचा कृतीआराखडा निश्चित प्रकाशवाटा व निपुण भारत अभियानाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत आढावा

(नंदुरबार) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रकाशवाटा’ प्रकल्प तसेच निपुण भारत (FLN) अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर शैक्षणिक आढावा घेण्यात आला. प्रकाशवाटा प्रकल्पांतर्गत नंदुरबार व तळोदा येथील तिन्ही केंद्रांची सद्यस्थिती, विद्यार्थी प्रवेश, उपस्थिती, उपलब्ध शैक्षणिक साहित्य, शिक्षक व विषयानुसार फॅकल्टीची उपलब्धता याबाबत केंद्रनिहाय आकडेवारी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्रातील मागील १५ दिवसांतील शैक्षणिक उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रशासनाचा कृतीआराखडा निश्चित प्रकाशवाटा व निपुण भारत अभियानाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत आढावा
Nandurbar-Education-Review

१०० मुले व १०० मुली प्रवेशाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास त्यामागील कारणे स्पष्ट करून उर्वरित प्रवेश पूर्ण करण्यासाठी Plan-B अंतर्गत ठोस कृती आराखडा व कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
निपुण भारत (FLN) अभियानांतर्गत इयत्ता २ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांची अद्ययावत स्थिती, अंमलबजावणी व त्याचे परिणाम यांचा आढावा घेण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांची १००% नोंदणी व १००% मूल्यांकन सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
शिक्षकांसाठी NIPUN ॲपचा वापर, विद्यार्थ्यांची नोंदणी, मोबाईलद्वारे मूल्यांकन, निकालांची अचूक नोंदणी व सादरीकरण यासाठी सविस्तर प्रशिक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आकडेवारीवर आधारित नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित आढावा यावर प्रशासनाचा भर आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250