परवानगीशिवाय महामार्गावर जेसीबीने खोदकाम; रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही सक्षम परवानगी न घेता जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवानगीशिवाय महामार्गावर जेसीबीने खोदकाम; रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
parvanagishivay-mahamargavar-jcbne-khodkam-rastyache-nuksan-ekaviruddh-gunha

नंदुरबार येथील चौधरी गल्लीत राहणाऱ्या रमेश्वर दाणेज याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी वर शासनाची कोणतीही सक्षम परवानगी तसेच संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता जेसीबीच्या साहाय्याने (क्र. एमएच ३९ एन ३७४८) रस्त्यावर खोदकाम केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात करण्यात आलेल्या या खोदकामामुळे रस्त्याचे नुकसान होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या प्रकाराची दखल घेत नंदुरबार नगरपरिषदेचे नगरअभियंता गणेश जोशी गावित यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून रमेश्वर दाणेज याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ३२४ (३), ३२६ (बी) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ मधील कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250