पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश: समता विद्यालयात शाडूच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

नंदुरबार:तालुक्यातील धानोरा येथील समता विद्यालय व प्रियदर्शिनी कन्या विद्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा आणि निसर्गाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने विद्यालयात शाडू मातीच्या गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश: समता विद्यालयात शाडूच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न
paryavaranpurak-ganeshotsavacha-sandesh-samata-vidyalayat-shaduchya-ganapati-murti-banavinyachi-karyashala-sampanna

या कार्यशाळेत समता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश कोळकर यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून आकर्षक व सुबक गणपती मूर्ती कशी तयार करावी, याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. केवळ मूर्ती बनवणेच नव्हे, तर आपल्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवताना कोणती कौशल्ये आणि बारकावे लक्षात ठेवावेत, याचे सुंदर मार्गदर्शनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.’चला पर्यावरण वाचवूया, आपल्या हाताने बाप्पा घडवूया’ या अत्यंत सकारात्मक संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर गणेशमूर्ती साकारल्या.प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) ऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींचा वापर केल्याने जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होते. हाच मोलाचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वतीने समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. विद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250