गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे “कौशल्याचा पुत्र राम” गीत प्रदर्शित
दापोली:-कोकणातील प्रसिद्ध गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव गीतकार संदेश काटकर यांच्या आवाजातील दुसरे गीत प्रदर्शित झाले आहे.
“कौशल्याचा पुत्र राम” या गीताच्या निर्मितीसाठी गजानन कासार, सागर कासार, सचिन येसरे, विजय बैकर, देवेंद्र शितप, रुपेश अंबावले.यांचे सहकार्य लाभले आहे तर संकल्पना संदेश येसरे यांची आहे सुमधुर स्वरांनी नटलेले हे गीत रसिकांनी नक्कीच ऐकावे व इतरांना ते सर्वांनी पुढे व्हायरल करावे अशी विनंती गायक संदेश काटकर यांनी केली आहे.

