विज्ञापित

नंदुरबार जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान; सीईओ नमन गोयल यांचे लोकसहभागाचे आवाहन

जिल्ह्यात दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा" अभियान राबविण्यांत येणार!
नंदुरबार जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान; सीईओ नमन गोयल यांचे लोकसहभागाचे आवाहन
swachhata-hi-seva-campaign-nandurbar-naman-goyal

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारे “स्वच्छता ही सेवा” हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यावर्षी ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या मुख्य संकल्पनेवर (Theme) आधारित असुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल(भाप्रसे) यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना हे अभियान लोकसहभागातून प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले आहे.

विज्ञापित

अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये व उपक्रम:
• सर्व स्तरांवर शुभारंभ: १७ सप्टेंबर रोजी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर एकाच वेळी परिसर स्वच्छता मोहीम राबवून अभियानाची सुरुवात केली जाईल.
• व्यापक लोकसहभाग: या स्वच्छता पंधरवाडयात गावातील सर्व घटकांना, नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना सक्रिय सहभागी करून घेतले जाईल.
• अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता: गावातील कचरा साचणारी, अस्वच्छ व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे ओळखून त्यांचे योग्य नशांकन (Mapping) केले जाईल आणि त्या जागांची पूर्णपणे स्वच्छता केली जाईल.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नंदुरबार घडवण्यासाठी या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: