ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी

लांजा:-तालुक्यातील आरगावचा सुपुत्र, सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या बाल जलतरणपटू रेयांश दीपक खामकर याने नुकत्याच 29 व 30 ऑगस्ट 2026 रोजी थायलंड, बँकॉक येथे झालेल्या एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत चार रौप्य (25मीटर बटरफ्लाय, 50 मीटर बटरफ्लाय, 50 मीटर बॅक स्ट्रोक, 50 मीटर फ्री स्टाइल) आणि एक कांस्य (100 मीटर फ्री स्टाइल) अशा एकूण पाच पदकांची कमाई करून सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली
ठाणेकर बाल जलतरणपटू रेयांश खामकर याची एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी
thane-bal-swimmer-reyansh-khamkar-asian-open-school-swimming-championship-shandar-kamgiri

स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेयांशने नेत्रदीपक कामगिरी करत बालवयात जलतरण स्पर्धा गाजवल्या आहेत. त्याच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांनी यापूर्वीच घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील रेयांशचा
सत्कार करण्यात आला होता.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250