गुरु हा शिष्य परंपरेचा केंद्र बिंदू-डॉ.नितीन बारी

तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर, तेथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. नितीन उत्तमराव बारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अनिल गोसावी यांनी केले. त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व कार्यक्रम कशासाठी घेतला जातो या मागील भूमिका स्पष्ट केली व शिक्षकाचे महत्त्व किती आहे या संबंधात विविध उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. बारी यांनी भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे ऐतिहासिक महत्त्व, बदलत्या काळातील शिक्षकाची भूमिका तसेच भविष्यातील शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक- विद्यार्थी संबंध याविषयी सविस्तर विवेचन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत असले तरी शिक्षकाचे मार्गदर्शक, संस्कार व मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्व घडवण्याची क्षमता शिक्षकांत कशी असते हे त्यांनी विविध उदाहरणातून मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक प्राचार्य डॉ.एच. एम. पाटील यांनीही नव्या शैक्षणिक धोरणातही गुरु शिष्य परंपरा आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्व असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी.एन. गिरासे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

