तोरणमाळ पर्यटन विकासाला नियोजनबद्ध दिशा

(नंदुरबार) सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य तोरणमाळ पर्यटनस्थळाचा विकास करताना निसर्गाचा समतोल राखून पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा नंदुरबार जिल्ह्याचे मा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
तोरणमाळ पर्यटन विकासाला नियोजनबद्ध दिशा
toranmal-paryatan-vikasala-niyojanbaddh-disha

मा.पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी तोरणमाळ येथे भेट देऊन पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्यासह वन, महसूल, जिल्हा परिषद व नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत यशवंत तलाव परिसराचा विकास, नौकानयन, मुलांसाठी मनोरंजनाची साधने, वाहनतळ, पदपथ, निवास व भोजन व्यवस्था यांसारख्या सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विकासकामे करताना सातपुड्याचा नैसर्गिक ठेवा आणि पर्यावरण अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यानंतर सीताखाई, यशवंत तलाव यांसह विविध पर्यटनस्थळांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून विकासकामांची माहिती घेण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी पर्यटकांना स्थानिक पातळीवर निवास सुविधा मिळावी यासाठी ‘होम स्टे’ मॉडेल विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली.
निसर्ग संवर्धनासोबत पर्यटन विकास — तोरणमाळच्या उज्ज्वल पर्यटन भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल!

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250