विज्ञापित

नंदुरबारच्या भूमीचा अभिमानी क्षण: ८१ किलोमीटरचे अथांग अंतर, १२ तास २३ मिनिटांची झुंज अन् इतिहास!

नंदुरबार : जेव्हा उराशी जिद्द आणि अहोरात्र घेतलेले कष्ट असतात, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही इतिहास बनतात! ८१ किलोमीटरचे प्रचंड अंतर... जे साध्या माणसाला जमिनीवर चालतानाही थकवून सोडते, तेच अंतर पश्चिम बंगालच्या लाटांशी दोन हात करत अवघ्या १२ तास २३ मिनिटांत पोहून पूर्ण करत नंदुरबारच्या एका युवा जलतरणपटूने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे नंदुरबारचा सुपुत्र निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी याने या अभूतपूर्व कामगिरीसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा सुवर्णतुरा रोवला आहे
नंदुरबारच्या भूमीचा अभिमानी क्षण: ८१ किलोमीटरचे अथांग अंतर, १२ तास २३ मिनिटांची झुंज अन् इतिहास!
nandurbar-proud-moment-81-km-swim-12-hours-23-minutes-history
अथक संघर्षातून साकारलेला जागतिक पराक्रम पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जलतरण संघटना आणि भारतीय जलतरण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ८० व्या जागतिक लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेत निर्मलने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. पाण्याच्या ताकदीशी आणि वेगाशी सलग १२ तासांहून अधिक काळ संघर्ष करत त्याने ८१ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले. इतक्या कठीण आणि लांब पल्ल्याच्या स्पर्धेत हे यश मिळवणारा निर्मल हा जगातील सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरला आहे.
अडचणींवर मात करत गाठले ध्येय निर्मलचे हे यश सहज साध्य झालेले नाही; यामागे त्याची अफाट मेहनत आणि निष्ठेची कहाणी आहे. निर्मलने या ऐतिहासिक स्पर्धेसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव आणि सी.बी. वॉटर पार्क येथे तासन्‌तास सराव केला. दरम्यानच्या काळात शासकीय जलतरण तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंद असताना सरावात खंड पडू नये म्हणून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सी.बी. वॉटर पार्क येथे निर्मलसाठी सरावाची विशेष सोय उपलब्ध करून दिली होती.
मार्गदर्शन आणि पालकांचे खंबीर पाठबळ निर्मलच्या या ऐतिहासिक यशामागे प्रशिक्षक राहुल काळे आणि अमोल भोयर यांचे अचूक मार्गदर्शन लाभले. तसेच त्याचे वडील भूपेंद्रसिंग आरंभी आणि कुटुंबाचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन या प्रवासात अत्यंत मोलाचे ठरले.
पाण्याच्या प्रवाहावर आपले नाव कोरणारा नंदुरबारचा हा हिरो आज संपूर्ण क्रीडा विश्वात कौतुकाचा विषय ठरला असून, त्याच्या या पराक्रमाने खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: