महाराष्ट्र सदनात उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना
या मंगल सोहळ्यास महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू, अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभाग मनीषा वर्मा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार यांच्यासह विविध वि
ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन
गणरायाच्या प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी कोपर्निकस मार्गावर उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेतील गणेशभक्तांच्या सहभागामुळे मिरवणुकीला मराठमोळा साज लाभला. मिरवणुकीनंतर महाराष्ट्र सदनात पारंपरिक पद्धतीने पूजा, मंत्रोच्चार आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सदनासह दिल्ली आणि परिसरातील विविध गणेश मंडळांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये मराठमोळी लावणी, लोकनृत्य, नाट्यप्रयोग, संगीत कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन आणि भजनसंध्या आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

